St. Paul’s School and Junior College Students State Level Selection in Ashtidu Akhara Competition
चंद्रपूर :- दिनांक 27 जुलै 2024 रोजी अटल बिहारी वाजपेयी स्टेडीयम विसापूर येथे जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हातील विविध शाळेंनी सहभाग नोदविला होता.
सेंट पॉल स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय चे विद्यार्थांनी वेगवेगळया खेळात सहभागी होवुन 46 पदके आणि प्रमाणपत्र मिळविली.
विजेत्या विद्यार्थांना माजी अध्यक्ष वनविकास महाराष्ट्र श्री. चंदनसिह चंदेल यांच्या हस्ते करंडक देवुन सन्मानित करण्यात आले. विजेत्या खेळाडुंचे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
विजयी विद्यार्थांचा सत्कार करण्यासाठी 29 जुलै 2024 रोजी शाळेत समारंभाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अविनाश खैरे आणि संचालिका निना खैरे यांनी विद्यार्थीनी आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा देवुन त्यांचे अभिनंदन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मेनका भंडुला यांनी पुष्पगुच्छ देवुन विजेत्यांचे स्वागत केले किडा प्रशिक्षक प्रमोद वासेकर व मनोज डे सर आणि रजनी मिश्रा मॅम यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थांनी हे यश संपादन केले.
शाळेच्या सर्व शिक्षकवृंद आणि कर्मचारी वर्गांनी विद्यार्थांच्या यशाबददल त्यांचे कौतुक केले