Another firing in Chandrapur, death of Haji Sarwar: Increase in firing incidents
चंद्रपूर :- चंद्रपुरात गोळीबारी च्या घटना सातत्याने वाढवताना दिसून येत आहे, अशीच खळबळजनक घटना आज पुन्हा चंद्रपुरात घडली. आज दुपारच्या सुमारामध्ये बिनबा गेट जवळील शाही दरबार या हॉटेलमध्ये भर दिवसा हाजी अली याच्यावर अंधाधुंद गोळीबार तसेच तलवारी ने हल्ला करण्यात आला यात हाजी सरवर याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. Another firing in Chandrapur, death
मिळालेल्या माहितीनुसार हाजी अली सरवर हे साई दरबार या हॉटेलमध्ये जेवण करत असताना पाच ते सहा अज्ञात आरोपी सशस्त्र सह आले व त्यांनी अंधातून गोळीबार केला यामध्ये हाजी अली यांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. Chandrapur Crime
हाजी अली सरवर हा घुग्गुस येथील गुन्हेगारी जगतातील नामी असल्याचे बोलल्या जात आहे.
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून गोळीबारीच्या घटनामध्ये वाढ होत आहे.