Saturday, May 9, 2026
HomeCrimeपत्नीच्या खुनातील आरोपी पतीला जन्मठेप

पत्नीच्या खुनातील आरोपी पतीला जन्मठेप

Husband Accused of Wife’s Murder Sentenced to Life Imprisonment

चंद्रपूर :- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर यांनी जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावत कठोर संदेश दिला आहे. मा. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. प्रकाश कदम (डीजे-१) यांनी दिलेल्या निकालामुळे कोठारी पोलिसांच्या तपासकार्याला मोठे यश मिळाले आहे. Kothari Police Investigation Yields Success

‘राजा शिवाजी’ चित्रपट करमुक्त करा……

प्राप्त माहितीनुसार, ही धक्कादायक घटना १२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यातील मौजा कुडेसावली येथे घडली होती. आरोपी धनपाल माधव रामटेके (वय ६०) याने पत्नी वंदना धनपाल रामटेके (वय ६०) हिच्या चारित्र्यावर संशय घेत संतापाच्या भरात चाकूने वार करून तिची हत्या केली होती.

या प्रकरणी मृतक महिलेचा मुलगा अमर धनपाल रामटेके (वय ३०) याने दिलेल्या तक्रारीवरून कोठारी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोठारी पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनी योगेश खरसान यांनी प्रकरणाचा सखोल तपास करत आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. Husband Accused of Wife’s Murder Sentenced to Life Imprisonment

खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी अभियोक्ता अॅड. आसिफ शेख यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब तसेच केमिकल अॅनालायझर (सी.ए.) रिपोर्ट यांसारखे सबळ पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी धनपाल रामटेके याला दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपीस भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत आजीवन सश्रम कारावास (जन्मठेप) व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास भोगावा लागणार आहे.

या संपूर्ण प्रकरणात तपास अधिकारी म्हणून सपोनी योगेश खरसान यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली तसेच पैरवी अधिकारी मपोशि मनीषा गोवर्धन चिवंडे यांनीही खटल्याच्या सुनावणीत मोलाचे योगदान दिले.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular