Truck collides with two-wheeler on Kothari highways: Two-wheeler dies on the spot
चंद्रपूर :- बल्लारपूरकडून गोंडपिंपरिकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास ट्रकने चिरडल्याची घटना Terrible Accident कोठारी येथे आशिष बार अँड रेस्टॉरंट जवळ राष्ट्रीय महामार्गावर आज दि. 4 ऑगस्टला साय. 5-30 वाजताच्या दरम्यान घडली. यात दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. Truck collides with two-wheeler on Kothari highways
बल्लारपूर कडून गोंडपीपरी कडे दुचाकी क्र.एम.एच.33 ए ए 6584 ने जात असताना कोठारी जवळ आशिष बार अँड रेस्ट।रंट जवळ बैलबंडीला ओव्हरटेक करीत असताना समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीस धडक दिली व ट्रक सुसाट वेगाने पळून गेला. यात दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाला. दुचाकीस्वार हा चामोर्शी तालुक्यातील असल्याचे समजते.
सदर प्रकारची माहिती कोठारी पोलिसांना समजताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची नोंद कोठारीचे ठाणेदार आशिष बोरकर यांनी घेतली असून अपघात करून पसार झालेल्या ट्रकचा शोध कोठारी पोलीस घेत आहेत.