Saturday, May 9, 2026
HomeCrimeमहिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या ‘सखी’ केंद्रातच सुविधांचा अभाव

महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या ‘सखी’ केंद्रातच सुविधांचा अभाव

Immediately Resolve Issues at the ‘One Stop Center’ (Sakhi)

चंद्रपूर :- महिलांवरील घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये पीडितांना तातडीची मदत व आधार मिळावा या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल कल्याण मंत्रालयामार्फत सुरू करण्यात आलेल्या ‘वन स्टॉप सेंटर (सखी)’ मधील विविध समस्यांबाबत भाजपा महिला मोर्चाने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना निवेदन सादर केले. Immediately Resolve Issues at the ‘One Stop Center’ (Sakhi)

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची प्रभावी अंमलबजावणी करा…..

२०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर सुरू करण्यात आलेल्या या केंद्रामध्ये महिलांना वैद्यकीय सेवा, समुपदेशन, कायदेविषयक मार्गदर्शन, पोलीस मदत, रेस्क्यू सुविधा अशा विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, चंद्रपूर शहरातील जलनगर परिसरात कार्यरत असलेल्या ‘सखी’ केंद्रामध्ये अनेक मूलभूत समस्या असल्याचे भाजपा महिला मोर्चाच्या आकस्मिक भेटीदरम्यान उघड झाले.

महाराजस्व अभियानात जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी…..

दिनांक ७ मे रोजी भाजपा महिला मोर्चाच्या Chandrapur BJP Mahila Morcha पदाधिकाऱ्यांनी केंद्राला भेट दिली असता, येथे पूर्णवेळ समुपदेशकाची नियुक्ती नसल्याची गंभीर बाब समोर आली. तसेच केंद्र गुगल मॅपवर उपलब्ध नसणे, केंद्राबाबत पुरेशी जनजागृती न होणे, अधिकृत वेबसाईट नसणे अशा अनेक त्रुटी निदर्शनास आल्या.

या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांची भेट घेत समस्यांचे निवेदन सादर केले.

यावेळी महिला मोर्चाच्या पदाधिकारी व नगरसेविकांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करत महिलांच्या सुरक्षेशी संबंधित या केंद्रातील समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.

दरम्यान, जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी भाजपा महिला आघाडीच्या चंद्रपूर शहराध्यक्ष छबु वैरागडे, नगरसेविका जयश्री जुमडे, नगरसेविका सुनीता जयस्वाल, नगरसेविका सविता सरकार, भाजपा नेत्या नम्रता ठेमस्कर, चंद्रकला सोयाम, रुपाली आंबटकर, हिना शेख, आशा उके, रेवती चौखंडे, सीमा धुर्वे, सरोज मिश्रा, महेंद्र जुमडे व प्रलय सरकार आदी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular