Murder of youth in Mahakali Colliery area LCB arrested 3 accused in just two hours
चंद्रपूर :- शहरातील महाकाली कॉलरी परिसरात राहणाऱ्या आर्यन आरेवार (17 वर्ष) या अल्पवयीन युवकाचा त्याच वार्डातील युवकांनी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्रो 9 ते 9:30 च्या दरम्यान जुन्या वैमनस्यातून संगणमताने धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले आणी मोटर सायकलने पसार झाले. स्थानिकांनी युवकाला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असतांना वाटेतच मृत्यू झाला. Chandrapur Murder Crime
घटनास्थळी चंद्रपूर शहर पोलीस दाखल होत गुन्हा दाखल करण्यात आला, दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे
पोनी महेश कोंडावार यांना प्राप्त होताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन तांत्रीक व कौशल्यपुर्ण तपास करून अवघ्या दोन तासातच पळून गेलेल्या आरोपीस मोटर सायकल सह मौजा चुनाळा ता. राजूरा येथून अटक करण्यात आली. Local Crime Branch Chandrapur
यात आरोपी अश्वीन उर्फ बंटी राजेश सलमवार (28 वर्षे) रा. महाकाली कॉलरी चंद्रपूर, जॉन विलास बोलीवार (19 वर्षे) रा. लालपेठ कॉलरी नं. 1 चंद्रपूर, जसिम नसीम खान (24 वर्षे) रा. जमनजेटी दर्गा जवळ, चंद्रपूर या तीन्ही आरोपीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.
तिन्ही आरोपीना पुढिल तपासकामी पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची यशस्वी कामगीरी मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पो.नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिपक कांकेडवार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पो.हवा. सुभाष गोहोकार ना.पो. कॉ संतोष येलपूलवार, पो.कॉ. गोपीनाथ नरोटे, गोपाल आतकुलवार, मिलींद जाभुळे, दिनेश अराडे यांनी केली.