NCP Mahila Congress Sharad Chandra Pawar group distributed blankets, sarees to the flood victims of Chichapally
चंद्रपूर :- मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे चिचपल्ली येथील मामा तलाव फुटल्याने 250 नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, घरातील कपडे, धान्य, जीवनाशक वस्तू, जनावरे बकरी, गायी पुरात वाहून गेले. distributed blankets, sarees to the flood victims of Chichapally
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी प्रत्यक्ष नागरिकांशी भेट घेऊन संवाद साधला, ग्रामस्थांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली, त्यानुसार चिचपल्ली येथे स्वखर्चाने ब्लॅंकेट, पातळ, साडी, पूरग्रस्तांना एक हात मदतीचा मदत नव्हे तर कर्तव्य हे भूमिका ठेवून पूरग्रस्तांना आवश्यक असलेल्या वस्तू वितरण करण्यात आले. NCP Mahila Congress Sharad Chandra Pawar group
यावेळी पूरग्रस्तांना वाटप करताना माजी .युवती जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पूजाताई शेरकी, जिल्हा संघटिका सरस्वती गावंडे, जिल्हा सचिव शोभाताई घरडे, जिल्हा सरचिटणीस नंदा शेरकी, सरपंच पपीता कुमरे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र सूत्रपवार, सदस्य बाळू दुर्योधन, प्रफुल सामाजिक कार्यकर्ता सोयाम, किशोर कामटकर, सुलोचना करणेवार, छाया चौधरी, वनिता चांदेकर, अर्चना कामटकर चिचपल्ली गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.