30-year-old youth dies in tiger attack
चंद्रपूर :- रात्रौ शौचास गेलेल्या युवकावर हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक 1 मे रोजी रात्रौ 10 वाजताच्या सुमारास घडली असून दिवाकर बाबुराव जूमनाके (30 वर्ष) रा. चक पिंपळखुट, ता. चंद्रपूर असे मृतक युवकाचे नाव आहे.
चंद्रपूर तालुक्यातील चक पिंपळखुट येथील रहिवासी दिवाकर जुमनाके हा गुरूवारी रात्री दहाच्या सुमारास गावालगतच्या चिचपल्ली वनपरिक्षेत्रातील चंद्रपूर वनविभाग कक्ष क्रं. 1005 मध्ये शौचास गेला होता. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले. Tiger Attack
घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर वनविभागाचे कर्मचारी पोलिसांसह घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
या घटनेमुळे चक पिंपळखुट परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाच्या वतीने मृताच्या कुटुंबियांना 30 हजारांची मदत देण्यात आली आहे.