Recorded two-wheeler thief arrested by local crime branch
चंद्रपूर :- शहरातील बंगाली कॅम्प परिसरात बिना कागदपत्राची दुचाकी विक्री करण्यास आलेल्या इसमांकडून चंद्रपूर स्थानिक गुन्हेच्या पथकाने LCB कसून चौकशी केली असता सदर इसम हा सराईत वाहनचोर असल्याने त्याच्याकडून 9 दुचाकी वाहने असा एकूण 4,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. two-wheeler thief arrested by Local Crime Branch
चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात वाहन चोरीची घटना घडत असल्याने पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की बंगाली कॅम्प परिसरात एक इसम बिना कागदपत्राचे वाहन विक्रीसाठी ग्राहक सोधत आहे या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून इसमाला ताब्यात घेत विचारपूस केली असता सदर गुन्हेगार सराईत वाहनचोर निघाला, मिलिंद जयभारत डंबारे (32 वर्ष) रा. लोणी, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर असे या सराईत, रेकॉर्डवरील वाहनचोराचे नाव असून या वाहन चोराने चंद्रपूर, राजुरा व हिंगणघाट येथून एकूण 9 वाहने चोरी केल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले आहे.
आरोपीकडून एकूण 9 वाहनासह 4,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur Crime
सदर आरोपीवर चंद्रपुर जिल्हयात मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुग्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, सतिश अवथरे, रजनिकांत पुठ्ठवार, दिपक डोंगरे, प्रशांत नागोसे, किशोर वाकाटे, शशांक बदामवार, अमोल सावे, प्रमोद कोटनाके सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली.
