Wednesday, September 2, 2026
HomeAgricultureकेपीसीएल बरांज कोळसा खाण व चारा बॅंक स्थापने विषयी वनमंत्र्यांशी हंसराज अहीर...

केपीसीएल बरांज कोळसा खाण व चारा बॅंक स्थापने विषयी वनमंत्र्यांशी हंसराज अहीर यांची चर्चा

चंद्रपूर :- केपीसीएलच्या बरांज कोळसा खाणीशी निगडीत प्रश्न व वनविभागाशी संबंधित अन्य महत्वपूर्ण विषयाला घेऊन पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांनी दि. 1 सप्टेंबर 2026 रोजी महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक Forest Minister Ganesh Naik यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

चंद्रपुरात गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी…..

            या भेटीप्रसंगी कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (KPCL) च्या बरांज कोळसा खाणीद्वारे वनविभागाच्या मालकीतील 84.41 हेक्टर वनभूमीतून अंदाजे 1 लाख 30 हजार मे. टन कोळशाचे अवैधरित्या उत्खनन करण्यात आल्याची गंभीर बाब हंसराज अहीर यांनी वनमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिली. हे उत्खनन अटी व शर्तींचा भंग करून झाले असल्याचे कागदोपत्री पुरावे, विविध शासकीय पंचनामे तसेच वन अधिकाऱ्यांच्या अहवालातून उघडकीस आले असल्याचे सुध्दा अहीर यांनी यावेळी वनमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत निदर्शनास आणले. धारिवाल इन्फ्राचा अरण्यगर्भ,18 हजार वृक्षांची लागवड…..

            वनभुमीतील कोळशाचे उत्खनन बेकायदेशीर असून या प्रकरणात वन संवर्धन कायदा, 1980 तसेच भारतीय वन कायदा, 1927 च्या कायद्याचे उल्लंघन असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच संबंधित कंपनीने स्थानिक नागरिकांच्या निस्तार हक्कांवरही गदा आणली असल्याने केपीसीएल कंपनीविरुद्ध कठोर दंडात्मक कारवाई केली जावी, अशी मागणी अहीर यांनी वनमंत्र्यांना केली. गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार…..

            सदर गंभीर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जाईल व उच्चस्तरीय चौकशी अहवालाच्या आधारे दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. याविषयी कसलीही हयगय केली जाणार नाही, असे आश्वासन वनमंत्री नाईक यांनी हंसराज अहीर यांना याप्रसंगी दिले. चंद्रपूर जिल्ह्यात 12 सप्टेंबर रोजी लोक अदालत…..

            या भेटीत चारा बँकेच्या संकल्पनेबाबतही सविस्तर चर्चा झाली. जंगलातील वाया जाणारे गवत पशुधन तसेच गौमातेसाठी उपलब्ध करून देण्यासाठी चारा बँकेचा उपक्रम उपयुक्त असल्याची सकारात्मक भुमिका व्यक्त करून श्री. नाईक यांनी याविषयी मंत्रालयाद्वारे गंभीरपणे विचार केला जाईल याबाबतही अहीर यांना आश्वस्त केले. या भेटीत वनसंवर्धन, स्थानिक नागरिकांचे प्रश्न व अन्य समस्या, पशुधनासाठी वनविभागाच्या अख्त्यारितील जमिनीवर चाऱ्याची उपलब्धता यासंबंधात सुध्दा सकारात्मक चर्चा झाली.

बँकेचा उपक्रम उपयुक्त असल्याची सकारात्मक भुमिका व्यक्त करून श्री. नाईक यांनी याविषयी मंत्रालयाद्वारे गंभीरपणे विचार केला जाईल याबाबतही अहीर यांना आश्वस्त केले. या भेटीत वनसंवर्धनस्थानिक नागरिकांचे प्रश्न व अन्य समस्यापशुधनासाठी वनविभागाच्या अख्त्यारितील जमिनीवर चाऱ्याची उपलब्धता यासंबंधात सुध्दा सकारात्मक चर्चा झाली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular