Thursday, September 3, 2026
HomeAccidentआश्रमशाळेच्या जेवणात पालिचे तुकडे ! ३० विद्यार्थ्यांना विषबाधा 

आश्रमशाळेच्या जेवणात पालिचे तुकडे ! ३० विद्यार्थ्यांना विषबाधा 

चंद्रपूर :- जिवती तालुक्यातील नगराळा येथील अमरू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणात पालिचे तुकडे आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सुमारे ३० विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकारामुळे पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. Lizard pieces found in Ashram school meal! 30 students suffer food poisoning चंद्रपुरात गांजा तस्करी, 3 आंतरराज्यीय आरोपी जेरबंद……

या पार्श्वभूमीवर NSUI जिवती तालुका अध्यक्ष सूरज चिकटे यांनी पीडित विद्यार्थी व त्यांच्या पालकांची भेट घेतली असून, विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर संस्थाचालकांशी चर्चा करून भोजन व्यवस्थेतील कथित निष्काळजीपणाबाबत जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. चंद्रपूर रेल्वेला नवी गती, इंटरसिटी एक्सप्रेस, वर्धा पॅसेंजर, काजीपेठ……

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी व सुरक्षिततेशी संबंधित बाबतीत कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, अशी भूमिका NSUIने घेतली आहे. संस्थाचालकांनी संबंधित दोषींवर तीन दिवसांच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे एनएसयूआय कडून सांगण्यात आले.
मात्र, या मुदतीत ठोस कारवाई झाली नाही तर NSUI चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शफाक शेख यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपुरात गॅस सिलेंडर मधून गॅस चोरी……

NSUIच्या प्रमुख मागण्या
दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे, संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, भोजनाची गुणवत्ता तसेच स्वयंपाकघरातील स्वच्छता व व्यवस्थेची तपासणी करावी, बाधित विद्यार्थ्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आश्रमशाळांमध्ये कडक अन्नसुरक्षा व स्वच्छता नियम लागू करावेत. गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार……

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व दर्जेदार भोजन मिळणे ही प्रशासन व संबंधित व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी NSUIने केली आहे. कारवाई होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आपला लढा सुरूच राहील, असा इशारा जिल्हाध्यक्ष शफाक शेख यांनी दिला आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular