Establishment of Transportation Transport Committee for Student in Infant School
चंद्रपूर :- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी वाहतूक परिवहन समिती स्थापना करण्यात आली.
या प्रसंगी समितीच्या अध्यक्षपदी सीबीएसई शाखेकडून मुख्याध्यापिका मंजुषा अलोने आणि स्टेट शाखेकडून मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच या समितीचे उपाध्यक्षपदी वाहतूक पोलीस नियंत्रक श्री. दत्तात्रय लेनगुरे यांची निवड करण्यात आली. Establishment of Transportation Transport Committee for Student in Infant School
सचिवपदी शारीरिक शिक्षक पुंडलिक वाघमारे, शुभम बन्नेवार यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून सहाय्यक शिक्षक संतोष सागर, राम मेटपल्लीवार, पालक प्रतिनिधीमधून मिथलेश मुनगंटीवार, सौ अनुप्रिया गुरले, भास्कर बावणे, प्रवीण आस्वले, प्रकाश सुनामी आणि पालक-शिक्षक संघामधून सौ. वर्षा देवाळकर, श्री. रवि तुराणकर तसेच शाळेच्या बसचे चालक मधुकर इंगलकर, प्रवीण रांचालावार, प्रवीण चेंदे आणि बसच्या वाहक मंजू आत्राम , नीता लोहे उपस्थित होत्या.
या सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राम मेटपल्लीवार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.