Saturday, April 26, 2025
HomeMaharashtraविदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खा. प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा...

विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूरच्या पदाधिकाऱ्यांची खा. प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी सदिच्छा भेट

Vidarbha Teli Samaj Federation office bearers of District Chandrapur have a goodwill meeting with MP Pratibhatai Dhanorkar

चंद्रपूर :- चंद्रपूर – वणी – आर्णी लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या लोकप्रिय खासदार प्रतिभाताई धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांची चंद्रपूर कार्यालयात विदर्भ तेली समाज महासंघाचे Vidarbha Teli Samaj Federation केंद्रीय मार्गदर्शक एडवोकेट विजयराव मोगरे यांच्या नेतृत्वात, केंद्रीय उपाध्यक्ष डॉ विश्वास झाडे, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ संजय बेले, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ नामदेवराव वरभे, महिला अध्यक्ष सौ. चंदाताई वैरागडे, चंद्रपूर शहर अध्यक्ष अभय घाटे, मनीष खनके जेष्ठ विधितज्ञ् एड. वासुदेवराव खेळकर, एड टिपले, एड. अनिरुद्ध टिकले, प्रा डॉ. सुभाष गिरडे, डॉ. अभय बुटले, एड. प्रवीण पिसे, दिक्षात बेले यांनी सदिच्छा भेट घेतली.

भेटी दरम्यान अनेक विषयावर चर्चा झाली. चंद्रपूर- वणी-आर्णी लोकसभा निर्वांचन क्षेत्रात तेली समाज बहू संख्य प्रमाणात आहे परंतु स्वातंत्र्य नंतरही तेली समाजाचा पाहिजे तसा सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकास झालेला नाही.

याकरिता खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी विदर्भ तेली समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाकारिता सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन व बहुसंख्य असलेल्या समाजावर अन्याय होणार नाही ह्याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा चंद्रपूर पदाधिकारी व शिष्टमंडळाला दिले.

यावेळी तेली समाजाचे इतर मान्यवर उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular