Sunday, May 24, 2026
HomeCrimeनीट पेपर लीक प्रकरणाविरोधात युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन.

नीट पेपर लीक प्रकरणाविरोधात युवक काँग्रेसचे निषेध आंदोलन.

Youth Congress stages protest demonstration in Ballarpur against the NEET paper leak scandal

चंद्रपूर :- युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बल्लारपूर शहराध्यक्ष नरेश आनंद यांच्या नेतृत्वात बल्लारपूर येथे चंद्रपूर ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ भव्य निषेध आंदोलन करण्यात आले. Stages protest against the NEET paper leak scandal 603 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव………

बल्लारपूर शहरात आयोजित या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. चंद्रपूर च्या रखरखत्या उन्हात विद्यार्थ्यांचा मदतीचा हात……..

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाची तीव्र भावना आंदोलनातून व्यक्त करण्यात आली. Chandrapur Youth Congress मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेकडे विशेष लक्ष द्या…….

या आंदोलनात माजी नगरसेवक नरेश मुंदडा, विधानसभा उपाध्यक्ष मंगेश बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी युवक काँग्रेस, महिला काँग्रेसचे पदाधिकारी तसेच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान वक्त्यांनी नीट परीक्षेतील पेपर लीक प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीशी व भविष्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड होऊ नये, अशी भूमिका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय द्या, पेपर लीक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular