Nanaji Ade was elected as Taluka President of Kisan Congress.
चंद्रपूर :- महाष्ट्र किसान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष परागजी पाष्टे यांच्या मान्यतेने चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी जि.प. सदस्य नानाजी गोविंदा आदे यांची राजुरा तालुका किसान कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. Taluka President of Kisan Congress.
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या आदरणीय सोनियाजी गांधी, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे, खा. राहुलजी गांधी, प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या व पक्षाच्या विचारधारेनुसार किसान कॉंग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर यांच्या विकासात भरीव कार्य करणे व पक्ष संघटना मजबुतीने उभी करणे यासाठी स्थानिक पातळीवर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार यांना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नानाजी आदे यांच्याकडे किसान काँग्रेसची धुरा सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, सभापती विकास देवाळकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद, ओबीसी काँग्रेसचे नंदकिशोर वाढई, सुरेश पावडे, रामभाऊ देवईकर, धनराज चिंचोलकर, अविनाश जेनेकर यासह काँग्रेस फ्रंटल आर्गनायझेशन च्या विविध पदाध व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.