Tiger claws seized in Chandrapur: Action taken by Local Crime Branch Chandrapur
चंद्रपूर :- वाघ या वन्यप्राण्याची वाघनखे विक्री करणाऱ्या टोळीतील काही आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून चंद्रपूर शहरातील गिरीराज हॉटेल येथून दोन आरोपीना अटक करीत 2 वाघनखे जप्त केली. Tiger claws seized in Chandrapur
चंद्रपुर जिल्ह्यामध्ये पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदे करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर जिल्हा पोलीसांच्या Chandrapur Police वतीने चालु आहे. त्याअनुषंगाने LCB स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक अवैध धंद्यांची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याची मोहीम राबवित होते. Chandrapur Crime
यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनिय माहिती मिळाली की, काही इसमांची टोळी वाघ या वन्यप्राण्याची नखे विक्री करण्याकरीता चंद्रपुर येथील गिरीराज हॉटेलसमोर येणार आहे.
सदर गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरुपाचा असल्याने स्थानिक गुन्हे शाखाचे पो.नि. महेश कोंडावार यांच्या आदेशान्वये चंद्रपूर कोर्टासमोरील गिरीराज हॉटेल येथे सापळा रचून वाघ या वन्य प्राण्याची नखे विक्री Tiger claws करण्याकरीता आणलेल्या दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडून २ नग वाघाची नखे जप्त करण्यात आली.
यात आरोपी नंदकिशोर साहेबराव पिंपळे (51 वर्ष) रा. सिव्हील लाईल, रामनगर, चंद्रपुर, रविंद्र शिवचंद्र बोरकर (65 वर्ष) रा. नगीनाबाग, गुरांचे दवाखान्यासमोर, चंद्रपुर या दोन्ही आरोपी व वाघनखे पुढिल कार्यवाहीकरीता सहाय्यक वनसंरक्षक, वनविभाग चंद्रपुर Forest Department यांचे ताब्यात देण्यात आले.
सदर कामगिरी पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, सफौ. स्वामीदास चालेकर, पोहवा. नितीन कुरेकार, दिनेश अराडे, पो.अं. प्रशांत नागोसे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी केली आहे.