Monday, August 31, 2026
HomeEducationalजेसीआय चंद्रपूर पॉवरसिटीतर्फे १०० विद्यार्थ्यांना प्रभावी वक्तृत्वाचे धडे

जेसीआय चंद्रपूर पॉवरसिटीतर्फे १०० विद्यार्थ्यांना प्रभावी वक्तृत्वाचे धडे

चंद्रपूर :- विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणांना चालना देण्यासाठी जेसीआय चंद्रपूर पॉवरसिटीच्या वतीने प्रभावी सार्वजनिक वक्तृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर पब्लिक हायस्कूल, शास्त्री नगर येथे झालेल्या या एकदिवसीय प्रशिक्षणात १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. Effective public speaking training for 100 students

चंद्रपूर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी जाहीर……..

‘प्रभावी सार्वजनिक वक्तृत्व’ या विषयावर आयोजित प्रशिक्षणाचे मार्गदर्शन जेसीआयच्या प्रमाणित विभागीय प्रशिक्षक तथा जेसीआय सिनेटर सोनम कपूर यांनी केले. प्रभावी संवाद, आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, सार्वजनिक ठिकाणी विचार मांडण्याची कला आणि संवादातून नेतृत्व करण्याचे कौशल्य याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. JCI Chandrapur Powercity चंद्रपुरातील कष्टकऱ्यांच्या हातावर प्रेमाची राखी…..

संवादात्मक पद्धतीने झालेल्या या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मनातील संकोच दूर करून विचार स्पष्ट, प्रभावी आणि आत्मविश्वासाने मांडण्याची प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वक्तृत्वकौशल्य किती महत्त्वाचे आहे, याची जाणीवही या माध्यमातून करून देण्यात आली.

वडिलांकडून मिळाले राष्ट्रसंतांच्या विचारांचे संस्कार…

कार्यक्रमाचे आयोजन जेसीआय सिनेटर तथा अध्यक्षा सोनम कपूर, माजी अध्यक्ष पंकज नागरकर आणि प्रशिक्षण उपाध्यक्ष अमोल बल्लावार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. प्रकल्प संचालक म्हणून अनूपा भांबरी, डॉ. अंकित निनावे आणि डॉ. श्रुती निनावे यांनी जबाबदारी सांभाळली.

समारोपप्रसंगी सचिन पित्तूलवार, दिलीप, सीमा घोडशालवार, डॉ. तनिका नागरकर, कविता उमाळे, सल्लागार डॉ. अमित पोरेड्डीवार, रितुल नागराळे आणि सुहानी पोइनकर यांची उपस्थिती होती.

प्रशिक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी झालेल्या सर्व १०० विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासपूर्ण वक्ते आणि भविष्यातील सक्षम नेतृत्वकर्ते घडविण्याच्या दिशेने जेसीआय चंद्रपूर पॉवरसिटीने राबविलेला हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व सदस्यांचे व उपस्थित मान्यवरांचे आयोजकांनी आभार मानले.

‘आत्मविश्वासाने बोला, प्रभावीपणे नेतृत्व करा!’ या प्रेरणादायी संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular