चंद्रपूर :- रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधत आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराच्या वतीने गांधी चौकातील कष्टकरी बांधवांसाठी राखी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून बाजारातील कष्टकरी, विक्रेते व विविध समाजघटकांशी बंधुभावाचे नाते दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. Rakhi festival organized by the ‘Sudhirbhau Mitra Parivar’
चंद्रपूर जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी जाहीर…..
या राखी महोत्सवाचे उद्घाटन महापौर संगीता खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी गांधी चौकातील एका स्थानिक फळ विक्रेत्याला राखी बांधून आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वतीने शुभेच्छापत्र दिले. त्यानंतर सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवारातील महिला सदस्यांनी संपूर्ण बाजार परिसरातील भाजी विक्रेते, फळ विक्रेते, हमाल, धान्य विक्रेते, फुल विक्रेते, ऑटोचालक तसेच दुकानदारांना राख्या बांधून शुभेच्छापत्र दिले.
कष्टकरी बांधवांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला. रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीपुरता मर्यादित न राहता समाजातील विविध घटकांना प्रेमाच्या आणि आपुलकीच्या बंधनात जोडणारा ठरावा, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
भाजप कार्यकर्त्या नम्रता आचार्य-ठेमस्कर यांच्या संकल्पनेतून हा राखी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विविध समाजघटकांतील नागरिकांना राख्या बांधून हा उपक्रम एक आठवडा सुरू राहणार असल्याची माहिती नम्रता आचार्य-ठेमस्कर यांनी दिली.
यावेळी महानगरपालिका सभागृह नेत्या जयश्री जुमडे, नगरसेविका सुनीता जयस्वाल, नगरसेविका सविता सरकार, माला माणिकपुरी, सीमा धुर्वे, हीना शेख, शीतल आत्राम, सिंधू राजगुरे, संगीता बावने, शुभांगी दिकोंडवार, नाझीरा सय्यद, शर्मीली मिश्रा, सपना तेलतुंबडे, कोणिका सरकार, रुपाली आंबटकर, आशा उके, आशा सरपाते, बसंती जयस्वाल आदी उपस्थित होत्या.
