Saturday, January 17, 2026
HomeAcb Trapमूल येथे युवकाची हत्या, तीन आरोपींना अटक एक फरार

मूल येथे युवकाची हत्या, तीन आरोपींना अटक एक फरार

Murder of youth in Mool city: Three accused arrested and one absconding

चंद्रपूर :- मूल येथील युवकाची काही अज्ञातांनी चाकूने सपासप वार करून निघृन हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी (दि.28) रात्रो 10:30 वाजता दरम्यान शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर घडली. घटनेने मूल शहरात दहशत पसरली.
रितिक अनिल शेंडे वय (24 वर्ष) वार्ड क्रमांक 16 विहिरगाव असे मृत युवकांचे नाव आहे. राहुल सत्तन पासवान (20 वर्ष),अजय गोटेफोडे (22 वर्ष) व 1 विधिसंघर्ष बालक सहित तिघांना अटक केली असून हत्या प्रकरणात 1 आरोपी फरार आहे.

रितीक शेंडे हा पंचायत समिती कार्यालयासमोरील बसस्थानकाजवळ दुचाकीवर भ्रमणध्वनीवर बोलत असताना अचानक आरोपी युवकांनी रितिकच्या छातीवर,पोटावर व कंबरेवर सपासप वार केले, अचानक झालेल्या या हल्ल्यात रितीक रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.
आरोपी यावरच थांबले नाही तर रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांना चाकू दाखवून ‘चले जाओ नहीं तो हम तुम्हे भी खतम कर देंगे’ अशी चेतावणी दिली. भीतीने जवळपास असलेले नागरिक तहसील कार्यालयाच्या गेटच्या आतमध्ये गेले. मात्र रीतिकला वाचवायला कुणीही धावून गेले नाही. रितीक ला मारल्यांनंतर आरोपीनी घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिकांनी रीतिकला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रितिकला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच नागरिकानी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती.

आरोपीना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने प्रयत्न करीत राहुल पासवान, अजय गोटेफोडे व एका विधिसंघर्ष बालकाला चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अटक केली.
आरोपीवर कलम 103 (1), 3(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करीत मूल पोलीसांच्या ताब्यात दिले.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली.
प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस करीत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular