Saturday, January 17, 2026
HomeAcb Trapओबीसी आरक्षण धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करा - हंसराज अहीर

ओबीसी आरक्षण धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करा – हंसराज अहीर

Strict implementation of OBC reservation policy – Hansraj Ahir

चंद्रपूर/यवतमाळ /नागपूर :- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर Hansraj Ahir यांचे अध्यक्षतेखाली मुंबई येथील मुख्य शासकीय अतिथीगृहात नुकतीच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये वनविभाग, नाबार्ड, पणन महासंघ, नियोजन, सहकार आयुक्त, ओबीसी वेलफेअर विभाग, ओएनजीसी व बृहमुंबई महानगरपालिका या सर्व विभागातील उच्चस्तरीय अधिकारी उपस्थित होते. Strict implementation of OBC reservation policy – Hansraj Ahir

सदर सुनावणी दरम्यान सर्व विभागाशी संबंधित असलेल्या ओबीसी आरक्षण व आरक्षण रोष्टरच्या वर्तमान स्थितीचा अहवाल मा. अध्यक्ष महोदयांना सादर करण्यात आला. या अहवालानुसार ओबीसी आरक्षण विषयक धोरणाची रोष्टरप्रमाणे काटेकोर अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याबाबत आयोगाने शहानिशा करून घेत संबंधित अधिकाऱ्यांनी ओबीसी कर्मचाऱ्याऱ्यांना त्यांच्या न्यायोचित आरक्षणाचे लाभ मिळतील याविषयी काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश एनसीबीसी अध्यक्ष हंसराज अहीर यांनी या सुनावणी दरम्यान दिले.

या सुनावणीमध्ये कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमि. (केपीसीएल) द्वारा मौजा बरांज, बरांज (मो.), चिचोर्डी या गावातील वनजमिनीवरील निस्तार हक्काचे उल्लंघन, जिवती तालुक्यातील वनजमिनीचा प्रश्न निर्वनीकरणाद्वारे मार्गी लावणे तसेच वेकोलिद्वारा अधिग्रहीत क्षेत्रातील वनजमिनीचा विषय, नाबार्डचे माध्यमातून विविध शेती उपक्रमांसाठी थेट किंवा अप्रत्यक्ष होणारा वित्त पुरवठा, कापुस-सोयाबीन खरेदी, जिल्हा सहकारी बँकेतील नोकरभरतीत ओबीसी आरक्षण व सर्व विभागांतर्गत असलेल्या अनेकविध समस्यांचे यथाशीघ्र निराकरण करण्याबाबत आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित विभागनिहाय अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

आपापल्या विभागातील सुनावणी दरम्यान उपस्थित केलेल्या मुद्दयांचा वस्तुनिष्ठ अहवाल मा. अध्यक्ष महोदयांना संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी सादर केला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular