Saturday, January 17, 2026
HomeSocialतुलना येथे सावित्रीबाई फुले जयंती आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन.

तुलना येथे सावित्रीबाई फुले जयंती आणि हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन.

Organized Savitribai Phule Jayanti and Haldi Kunku program at Tulana

चंद्रपूर :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण अभियान पंचायत समिती राजुरा, खुशी महिला ग्राम संघ तुलाना यांच्या संयोजनातून राजुरा तालुक्यातील मौजा तुलाना येथे सावित्रीबाई फुले जयंती तसेच हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट शेतीकाम सारिका वांढरे व उत्तम कापूस कविता वडस्कर यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. Savitribai Phule Jayanti and Haldi Kunku program

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रामकृष्ण मडावी, प्रमुख पाहुणे माजी सभापती कुंदा जेनेकर, माजी नगरसेविका संध्या चांदेकर, महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत कल्याणी कुलसंगे, उमेद अभियान आयबीसीबी चे कन्नाके सर, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक नवले सर, शिक्षक मेंडुलकर सर, आयसीआरपी भावना मडावी, ग्रा प सदस्य नीलकंठ राऊत, पोलीस पाटील शुभांगी आत्राम, ग्राम संघ अध्यक्ष अर्चना भागेवाड, सचिव कुसुम टेकाम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे स्वागतगीत सुषमा वांढरे यांनी सादर केले, कार्यक्रमाचे संचालन पथक अधिकारी पल्लवी बोबडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रविना लांडे लिपिक ग्राम संघ यांनी केले. कार्यक्रमाला ग्राम संघातील इतर महिला, स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular