Saturday, January 24, 2026
HomeCrimeघरफोडीतील मुख्य आरोपीसह दोघांना अटक

घरफोडीतील मुख्य आरोपीसह दोघांना अटक

Two minors arrested along with main accused in house burglary

चंद्रपूर :- घुग्गुस शहरात तसेच चंद्रपूर शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली यात मुख्य आरोपीसह दोन विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. Chandrapur Bulglary Crime

घुग्गुस पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 17 जानेवारी रोजी घरफोडीचा प्रकार घडला याची तक्रार घुग्गुस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. LCB स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने घरफोडीचा तपास करतांना गोपनीय माहितीच्या आधारे मोहम्मद सरफरोज शागीर शाह याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता गुन्ह्यांची कबुली दिली तसेच चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत दोन अल्पवयीन (विधिसंघर्ष) बालकांसह आणखी दोन घरफोडी घडवल्याची कबुली केली.
यावरून गुन्ह्यातील चोरी केलेले दागिने, वस्तू तसेच गुन्हात वापरलेली ऍक्टिव्हा मोपेड असा एकूण 3,67,690 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत, आरोपी मोहम्मद सरफरोज शागीर शाह (24 वर्ष) यासह दोन्ही विधिसंघर्ष बालकांना घुग्गुस पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतुत्वात दिपक कांकेडवार सहायक पोलीस निरीक्षक, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा चेतन गज्जलवार, जंयता चुनारकर, नितेश महात्मे, अमोल सावे, प्रफुल्ल गारघाटे, किशोर वाकाटे, महिला अंमलदार अपर्णा मानकर, दिपीका सोडणार, वाहनचालक दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी कारवाई केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular