School bus accident on Gadchandur routes MLA Subhash Dhote inquired about the condition of the students in the school bus accident
चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थी सकाळची शाळा आटोपून स्कूल बसने घरी परत येत असताना हरदोना येथे स्कूल बस पलटून अपघात झाला. School Bus Accident या बसमध्ये जवळपास ४० विद्यार्थी होते. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले.
ही बाब आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे प्रत्यक्ष भेटून जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांना सर्व जखमी विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देऊन उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी प्रा. आशिष देरकर, उमेश राजूरकर, विजय ठाकुरवार, सचिन भोयर, सागर ठाकुरवार, रुपेश चुधरी, सतीश बेतावर, मनोज भोजेकर, अभिषेक गोरे, मयुर एकरे यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.