Raid on illicit tobacco factory in Savli
चंद्रपूर :- सावली तालुक्यातील रयतवारी येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा अवैध साठा करून मशीनच्या सहाय्याने बनावट तंबाखूची निर्मिती व विक्री करणाऱ्या केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी), सावली पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाने संयुक्त धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत ११ लाख ३१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Raid on illicit tobacco factory
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, विजय भीमाजी भांडेकर (वय ३२, रा. सामदा बु., ता. सावली) हा रयतवारी येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा साठा करून मशीनच्या सहाय्याने बनावट तंबाखू तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एलसीबी, सावली पोलीस व अन्न सुरक्षा विभागाच्या संयुक्त पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. Police Raid
कारवाईदरम्यान पोलिसांनी HOLA व EAGLE ब्रँडचा तंबाखू, खुला सुगंधित तंबाखू, पॅकिंग साहित्य, उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री (मशीन) तसेच एक वाहन (एमएच-३४-सीजे-९६२५) असा एकूण ११.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चौकशीदरम्यान आरोपीने तंबाखू निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल गडचिरोली येथील एका व्यक्तीकडून खरेदी केल्याची कबुली दिली. जप्त साहित्यावरून मोठ्या प्रमाणात बनावट तंबाखूचे उत्पादन करून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमान्वये सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखाा चंद्रपूर आणि पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार पोस्टे सावली तसेच अन्न व अन्न सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचे नेतृत्वात सदर धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दीपक काँक्रेटवार, सपोनि बलराम झाडोकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, स. फौ. धनराज करकडे, पोहवा. गणेश भोयर, पोहवा. चेतन गज्जलवार, पोहवा. संतोष येलपुलवार, पोहवा. जयसिंग, चापोहवा. दिनेश आराडे, पो.अं. सुमित बर्डे, पो.अं. प्रफुल गारघाटे, चापोअं. मिलिंद टेकाम, ऋषभ बारसिंगे तसेच अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.