Saturday, June 13, 2026
HomeCrimeसिंदेवाहीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूवर पोलिसांचा छापा

सिंदेवाहीत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूवर पोलिसांचा छापा

LCB raids premises in Sindewahi; seizes banned scented tobacco

चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) LCB चंद्रपूरच्या पथकाने सिंदेवाही येथे धाडसी कारवाई करत प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व हुक्का साहित्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत २ लाख ८४ हजार ८४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. LCB raids on banned scented tobacco

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सिंदेवाही येथील आझाद चौक परिसरातील काही खोल्यांमध्ये अवैधरित्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व हुक्का शिशा साहित्याचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित ठिकाणी छापा टाकला. Police Raid

या कारवाईदरम्यान सागर प्रमोदराव केकरे (वय ३४, रा. आझाद चौक, सिंदेवाही) याला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळाची झडती घेतली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशा तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपीला पुढील कारवाईसाठी सिंदेवाही पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले.

या प्रकरणी सिंदेवाही पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर पुरवठादार व संबंधित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखाा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि दीपक काँक्रेटवार, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोहवा, गणेश मोहुर्ले, गणेश भोयर, चेतन गज्जलवार, संतोष पेलपुलवार, जयसिंग, सचिन गुरनुले, पो.अं. सुमित बरडे, अजित शेंडे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular