Saturday, January 18, 2025
HomeEducationalमहात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती दिनी सिदूर शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य...

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती दिनी सिदूर शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Distribution of school supplies to the students of Siddur School on Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri Jayanti

चंद्रपूर :- राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने सिदूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना नोटबुक व कंपास बॉक्स असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. Distribution of school supplies to the students

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर येथे 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी Mahatmas Gandhi तसेच भारतरत्न लालबहादूर शास्त्री Lal Bahaddur Shastri यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Oplus_131072

प्रतिष्ठान प्रेरणा फार्म चे संचालक डॉ. नरेंद्र कोलते यांच्या पुढाकाराने पंचायत समिती बल्लारपूर चे विस्तार अधिकारी रविंद्र लहामगे यांच्या हस्ते शाळेतील सर्व विध्यार्थ्यांना नोटबुक व कंपास बॉक्स या शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
शालेय उपयोगी साहित्य प्राप्त झाल्याने विध्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला.

सिदूर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबा सुर्तीकर यांनी विशेष परिश्रम घेत डॉ कोलते यांची भेट घेत शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन केले दरम्यान डॉ नरेंद्र कोलते यांनी सहकार्य केले.

याबद्दल शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष बाबा सुर्तीकर, उपाध्यक्षा रेखा शेलवटे, सिदूर ग्रामपंचायत चे उपसरपंच संजय गणफाडे, शाळेच्या मुख्याध्यापिका सुलोचना माहूरकर, सर्व शिक्षक वृंद तसेच अंगणवाडी सेविका आणी गावाकऱ्यांनी विशेष आभार मानले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular