Friday, June 12, 2026
HomeMaharashtraअनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी पुणे ते मुंबई पदयात्रा

अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी पुणे ते मुंबई पदयात्रा

Foot march from Pune to Mumbai for the implementation of sub-categorization within Scheduled Caste reservation

चंद्रपूर :- अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना, महाराष्ट्र यांच्या वतीने दि. १७ जून ते २४ जून २०२६ या कालावधीत पुणे ते मुंबई अशी पायी पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या पदयात्रेचा समारोप मुंबईतील आझाद मैदान येथे होणार असून राज्यभरातील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी आज (१२) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. implementation of sub-categorization within Scheduled Cast reservation

बनावट तंबाखू कारखान्यावर धाड…..

अनुसूचित जातीतील वंचित घटकांना न्याय मिळावा, आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत पोहोचावा आणि सामाजिक न्यायाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने ही पदयात्रा काढण्यात येत असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.

पदयात्रेद्वारे शासनाकडे अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण तात्काळ लागू करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करणे, ARTI संस्थेचे अर्थसंकल्पीय तरतूद वाढविणे, घाटकोपर येथील अण्णाभाऊ साठे स्मारकाचा विकास करणे तसेच समाजाच्या स्मशानभूमी व गायरान जमिनींचे प्रश्न तातडीने सोडविणे आदी प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.

सामाजिक न्याय, समान हक्क आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ही पदयात्रा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. राज्यातील सर्व समाजबांधव, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते, नोकरदार, व्यावसायिक तसेच विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना, महाराष्ट्रचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन भाऊ साठे करीत आहेत.

चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित पत्रपरिषदेत सामाजिक कार्यकर्त्या इंदिराताई लहुकांत काकडे (चंद्रपूर), डॉ. कुलभूषण मोरे, ॲड. राम मेंढे, माजी नगरसेवक रत्नमालाताई बावणे, राजूभाऊ येले, वामन आमटे, तालुका अध्यक्ष दिगांबर आंबटवार, आशिष नामवाड, नगरसेवक हिमांशु नामवाड, प्रल्हाद मदणे, सिमोन घोडके, अनिताताई नामवाड आदींची उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular