Review meeting of Rajura, Gondpipri Congress workers at Rajura
चंद्रपूर :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार राजुरा व गोंडपिपरी तालुका कांग्रेस कमिटीच्या वतीने गांधी भवन, गांधी चौक राजुरा येथे जिल्याचे पक्ष निरीक्षक आमदार अँड. अभिजित वंजारी, खासदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. Review meeting of Rajura, Gondpipri Congress workers
यावेळी मार्गदर्शन करताना आ. अँड. अभिजित वंजारी MLA Adv. Abhijit Vanjari यांनी सांगितले की, चंद्रपूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून येथे जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचेच उमेदवार विजयी होत आलेले आहेत. यावेळी सर्व काही व्यवस्थित असताना आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याचे चिंतन करून आपण कुठे कमी पडलो ते लक्षात घेऊन आपला बालेकिल्ला, आपला गड पून्हा काबीज करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले आहे. Congress workers should work to recapture the stronghold
बालाजी मंदिर दरोड्यातील आरोपीला अटक

ते पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात पक्षासाठी पुरेशी वेळ देऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कष्टाळू कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेत काम करण्यासाठी पुढे यावे तसेच ज्यांची ही तयारी नाही त्यांना नारळ दिलाच जाणार आहे किंवा त्यांनी स्वतःहून परिश्रमी व्यक्तींना संधी द्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर चे 7 नागरिक पहलगाम वरून सुखरुप पोहचले

