Monday, July 20, 2026
HomeEducationalचंद्रपुरात आज ‘लक्षवेध निदर्शनीय आंदोलन’

चंद्रपुरात आज ‘लक्षवेध निदर्शनीय आंदोलन’

चंद्रपूर :- देशभरात NEET परीक्षेतील कथित गैरव्यवस्थापन, विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक शैक्षणिक धोरणे आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला चंद्रपूर जिल्ह्यातूनही पाठिंबा मिळणार आहे. दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज (सोमवार, 20 जुलै) चंद्रपुरात ‘लक्षवेध निदर्शनीय आंदोलन’ आयोजित करण्यात आले आहे. ‘Attention-drawing protest’ held in Chandrapur today

हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी 12 वाजता होणार असून, जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, तसेच पुरोगामी विचारांच्या विविध सामाजिक संघटना या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

आंदोलनाच्या माध्यमातून NEET परीक्षेतील कथित गैरव्यवस्थापनाची निष्पक्ष चौकशी, विद्यार्थ्यांवरील अन्यायकारक शैक्षणिक धोरणांचा निषेध, पारदर्शक व विद्यार्थी-केंद्रित परीक्षा व्यवस्था आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

आयोजकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळात घडलेल्या कथित शैक्षणिक गैरव्यवस्थापनाची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. “NEET घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करा, विद्यार्थ्यांना न्याय द्या” अशी प्रमुख घोषणा आंदोलनात दिली जाणार आहे. Support extended to Sonam Wangchuk’s agitation

आंदोलन यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक, सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी हे आंदोलन महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही आयोजकांनी व्यक्त केला आहे.

 

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular