Friday, April 17, 2026
HomeCrimeबालाजी मंदीर दरोड्यातील आरोपी रामनगर गुन्हे शोध पथकाच्या जाळ्यात

बालाजी मंदीर दरोड्यातील आरोपी रामनगर गुन्हे शोध पथकाच्या जाळ्यात

Accused in Balaji temple robbery caught by Ramnagar Crime Investigation Team

चंद्रपूर :- दाताला रोड वरील बालाजी मंदिरात दिनांक 12 जानेवारी रोजी झालेल्या दरोड्यातील एका आरोपीला रामनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने तांत्रीकदृष्ट्या तपास करत आरोपी अक्षय जाधव (26 वर्ष) रा. अहिल्यानगर, नागपूर, हल्ली मुक्काम बॉम्बे प्लॉट, इंदिरा नगर, चंद्रपूर याला अटक केली असून दरोड्यातील 22,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. Balaji temple robbery accused caught by Ramnagar police

दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी दाताळा रोड बालाजी मंदीर येथे सुरक्षा रक्षक लहू चिकाटे रात्रोपाळी डयुटीवर असतांना रात्रीदरम्यान मंदीरात अनोळखी इसम तोंडावर दुपट्टा, रूमाल बांधलेले, डोक्यावर टोपरे अंगात जॅकेट,जिन्स पँट व पायात बुट घातलेले अंदाजे 25 ते 30 वर्ष वयाचा, मंदीरात येवून सुरक्षा रक्षक याचे तोंड दाबुन त्याला बाहेरील हॉल मध्ये नेवून त्याचे हात, पाय व तोंड बांधुन खिशातील रोख रक्कम 2000 रुपये, हातातील घडी, विवो कंपनीचा मोबाईल तसेच मंदीरातील दानपेटीतील रोख रक्कम असा एकुण 22500 रुपयांचा माल चोरून नेला अशी तक्रार सुरक्षा रक्षकानी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल केली.

गुन्हा दाखल होताच रामनगर पोलिस गुन्हे शोध पथकाने गांभीर्याने गुन्हयाचा तपास सुरू केला, तपासा दरम्यान यातील चोरीस गेलेल्या मालाचा व अज्ञात आरोपीचा गुप्त बातमीदार व तांत्रीकदृष्टया तपास केला असता त्या आधारावर मिळालेल्या माहितीनुसार आरोपी अक्षय दिलीप जाधव, (26 वर्ष) माताजीनगर एम. आय.डी.सी. एरीया नागापूर अहिल्यानगर ह.मु. बॉम्बे प्लॉट इंदिरानगर चंद्रपूर हयास अटक करून त्याचे ताब्यातुन गुन्हयात चोरीस गेलेला विवो कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे.

गुन्हयातील इतर आरोपींचा शोध सुरू असुन पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, चंद्रपूर अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक असीफराजा शेख, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे प्रमुख सपोनी देवाजी नरोटे, सपोनी उगले, पेत्रस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात, प्रशांत शेंद्रे. लालु यादव, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, हिरालाल गुप्ता, रविकुमार ढेंगळे, प्रफुल पुष्पलवार, संदीप कामडी, पंकज ठोंबरे, ब्युल्टी साखरे यांनी कार्यवाही केली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular