arrested with 33 grams of drugs in Chandrapur
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर LCB च्या पथकाने शहरातील पो. स्टे. रामनगर हद्दीत विक्री करण्याकरिता मे्फोड्रिंन (M.D.) अमली पदार्थ बाळगणाऱ्या आरोपीला 33.04 ग्रॅम एम.डी. (M.D.) सह ताब्यात घेत एन डी पी एस अन्वये कारवाई केली असून एकूण 1,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. MD drugs in Chandrapur
शहरातील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत एक युवक विक्रीसाठी एम डी अंमली पदार्थ बाळगून असल्याच्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून आरोपी युवकाला 33.04 ग्रॅम एम डी (मॅफेड्रन ड्रग्स) या अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली असून त्याचेकडून एकूण 1,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur Crime
आरोपी विरूद्ध पोलिस स्टेशन रामनगर येथे अपराध क्र. 323/25 कलम 8 (क), 22 (ब) NDPS Act 1985 अन्वये गून्हा नोंद करण्यात आला आहे.
बालाजी मंदिर दरोड्यातील आरोपी अटकेत
