Saturday, January 17, 2026
HomeAccidentरस्ता सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

रस्ता सुरक्षा सप्ताह दिनानिमित्त रॅलीचे आयोजन

Rally organized on the occasion of Road Safety Week

चंद्रपूर :- रस्ता सुरक्षा सप्ताह निमीत्य चंद्रपुर जिल्हयात पोलीस प्रशासनाच्या वतीने दिनांक 1 जानेवारी 2025 पासुन वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

पोलीस अधिक्षक मुमका सुदर्शन, चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर व नेहरू युवा केंद्र, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतुक नियंमांचे महत्व व मोटार वाहन कायद्याविषयी नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी याकरीता आज दिनांक 20 जानेवारी रोजी शालेय विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांची वाहतुक नियमनाविषयी जनजागृत्ती रॅली आयोजीत करण्यात आली.

जनजागृती रॅली ही वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर ते बस स्टॉप परत वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर पर्यंत काढण्यात आली. सदर जनजागृत्ती रॅली मध्ये सरदार पटेल महाविद्यालय, राजीव गांधी कॉलेज व इतर शाळेचे विद्यार्थी संबंधित शाळेचे शिक्षक तसेच श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस निरिक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर, श्री. प्रविण सोनोने, सहायक पोलीस निरिक्षक, वा. नि. शा. अॅड देवा पाचभाई व इतर नेहरू युवा केंद्राचे पदाधिकारी व वाहतुक पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.

या जनजागृत्ती निमित्ताने वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन मा.श्री. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular