Saturday, January 17, 2026
HomeAcb Trapतीन दिवसीय सरपंच महोत्सवाचे वरोरा येथे आयोजन

तीन दिवसीय सरपंच महोत्सवाचे वरोरा येथे आयोजन

A three-day Sarpanch festival in Varora

चंद्रपूर :- सरपंच महोत्सव समिती वरोरा यांनी जिल्हास्तरीय सरपंच आणि क्रीडा महोत्सवासोबतच ‘कृषी प्रदर्शन’ आणि ‘रक्तदान शिबिर’ आयोजित केले आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून समन्वय साधण्यासाठी सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचांना एकत्रित आणन्यासाठी राज्यात प्रथमच 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान वरोरा येथील काटन मार्केट परिसरात सरपंच महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच महोत्सव आयोजन समिति चे अध्यक्ष गणेश चवले यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. Three-day Sarpanch festival in Varora

सरपंच महोत्सवा दरम्यान, जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाईल आणि जिल्ह्यातील पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान केला जाईल. महोत्सवा दरम्यान, पंचायत राज प्रशिक्षण संस्था, सरकारी प्रतिनिधी आणि इतर मान्यवरांकडून संवाद आणि मार्गदर्शन केले जाईल. यासोबतच, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा क्रिडा कौशल्य आणि इतर प्रतिभेला उजाळा देण्यासाठी विविध क्रीडा स्पर्धा, संगीत मैफिली, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Gram Panchayat Sarpanches of the district

यासोबतच, तीन दिवसांच्या कार्यक्रमात विविध प्रकारचे स्टॉल देखील लावले जातील. त्यात महिला आणि पुरुष कबड्डी सामने आयोजित करण्यात आले आहेत. एकल आणि समूह नृत्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोकराव उईके यांच्या हस्ते होणार असून खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार नामदेव किरसान, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular