NEET student commits suicide in hostel
चंद्रपूर :- NEET निट परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या चंद्रपूर शहरातील इन्स्पायर कोचिंग क्लासेसच्या विध्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. प्रांजली राजूरकर असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. वसतिगृहात प्रांजलीच्या आत्महत्येने चंद्रपूर शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील सुप्रसिद्ध इन्स्पायर कोचिंग क्लासेस Inspire Coaching Classes येथे NEET निट परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रांजली राजूरकर या विध्यार्थिनीने तेथील वसतिगृहाच्या खोलीत बुधवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. NEET student commits suicide in hostel

प्रांजली ही यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील रहिवासी आहे. बारावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी तिने चंद्रपूर शहरातील इन्स्पायर कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. प्रांजली NEET परीक्षेची तयारी करत होती.
आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही, घटनेचा अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहेत.



