Sunday, August 23, 2026

बहुजन समाज पार्टी चंद्रपूर जिल्हा संघटनात्मक आढावा बैठक संपन्न

चंद्रपूर :- बहुजन समाज पार्टी (BSP) चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने प्रदेश अध्यक्ष मा. अॅड. सुनीलजी डोंगरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा संघटनात्मक समीक्षा व आढावा बैठक शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता पी.डब्ल्यू.डी. गेस्ट हाऊस, चंद्रपूर येथे उत्साहात संपन्न झाली.

या बैठकीचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मा. श्री. रत्नाकर साठे यांनी केले. बैठकीचे संचालन श्री. सुभाषजी पेटकर, जिल्हा महासचिव यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. बंबोडे साहेब, जिल्हा कोषाध्यक्ष यांनी केले.

बैठकीस मा. अॅड. सुनीलजी डोंगरे साहेब, प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र, मा. प्रा. डॉ. मोहनजी राईकवार साहेब, प्रदेश महासचिव तथा विदर्भ झोन प्रभारी, मा. इंजि. महेंद्रजी मकेश्वर साहेब, प्रदेश सचिव तथा चंद्रपूर जिल्हा प्रभारी, मा. Ex-IRS संजयजी थूल, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार, BSP कायदेविषयक सल्लागार अॅड. पाटील साहेब, मा. रत्नाकर साठे, जिल्हाध्यक्ष BSP चंद्रपूर, मा. धर्मेशजी निकोसे, चंद्रपूर लोकसभा प्रभारी
श्री. मंगेश ठाकरे, ओबीसी समाज नेते तसेच चंद्रपूर जिल्हा टीम उपस्थित होती.

बैठकीमध्ये BLA-2 संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन, संघटनात्मक समीक्षा, आगामी कार्यक्रमांचे नियोजन आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, विधानसभा स्तरावरील पदाधिकारी तसेच शहर स्तरावरील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्त्वपूर्ण नियुक्त्या व पक्षप्रवेश

बैठकीदरम्यान पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण नियुक्त्या करण्यात आल्या.

1. प्रा. देविदास जांबोडे — MANAA समाज जिल्हा संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
2. प्रा. राजेश ब्राम्हणे — लोकसभा प्रभारी.
3. विकास शंकर कामडे —अधिकृत पक्षप्रवेश केला.
4. प्रवीण इस्तारी वडई — अधिकृत पक्षप्रवेश केला.

5. शिवाजी आढे यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचेही उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले.

बैठकीत आगामी काळात बहुजन समाज पार्टीची संघटनात्मक ताकद वाढविणे, बूथ व सेक्टर स्तरापर्यंत पक्षाची संघटना मजबूत करणे तसेच पक्षाच्या विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

— बहुजन समाज पार्टी, चंद्रपूर जिल्हा

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular