Friday, January 17, 2025
HomeHealthचंद्रपूरच्या आशा बावणे नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूरच्या आशा बावणे नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित

Asha Bawane of Chandrapur honored with the Nightingale Award                       Awarded by the President of India

चंद्रपूर :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने आरोग्य क्षेत्रात निःस्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या 15 परिचारिका आणि परिचारकांचा गौरव करण्यात आला. National Florence Nightingale Award

या सोहळ्यात चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील परिचारिका आशा बावणे (सोनुने) यांना त्यांच्या 28 वर्षांच्या आरोग्यसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. एक लाख रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

आशा बावणे यांनी विशेषतः आदिवासी आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी डायरियाच्या प्रकोपावर नियंत्रण, हज यात्रेत आरोग्य सेवा, तसेच राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

कोविड – 19 महामारीच्या काळात त्यांनी केलेल्या टीकाकरण मोहिमेचे विशेष कौतुक झाले असून त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे त्या अनेक आरोग्य सेवकांसाठी प्रेरणास्रोत ठरल्या आहेत.

राष्ट्रपती Draupadi Murmoo President of India यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने आशा बावणे यांच्यावर आरोग्य विभागासह विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular