Saturday, August 22, 2026
HomeAccidentडॉ. आंबेडकर वैद्यकीय योजनेतून गंभीर आजारांसाठी ३.५० लाखांपर्यंत मदत

डॉ. आंबेडकर वैद्यकीय योजनेतून गंभीर आजारांसाठी ३.५० लाखांपर्यंत मदत

चंद्रपूर :- डॉ. आंबेडकर प्रतिष्ठान (सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार) मार्फत, अनुसूचित जाती (SC) व अनुसूचित जमाती (ST) घटकांतील गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी ‘डॉ. आंबेडकर वैद्यकीय सहाय्यता योजना’ Dr. Ambedkar Medical Scheme राबविली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील 2.70 लाख मतदारांची नावे धोक्यात…..

सन 2026 मध्ये या योजनेत सुधारणा करून पात्र आजार व आर्थिक मदतीची मर्यादा वाढविण्यात आली आहे. ज्यांची कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची मर्यादा रु. 5 लक्ष रुपयांपेक्षा कमी आहे, ते या योजनेस पात्र आहे. गणेशोत्सव, लेजर बंदी – 24*7 सायबर टीमची नजर, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश……

यात हार्ट सर्जरी – 1.50 लक्ष, किडनी सर्जरी / डायलीसीस – 3.50 लक्ष, कॅन्सर / सर्जरी / केमोथेरेपी / रेडिओथेरेपी – 2.50 लक्ष, ब्रेन सर्जरी- 2 लक्ष, किडनी / ऑर्गन ट्रान्सप्लॅन्ट- 3.50 लक्ष, स्पिनल सर्जरी- 1.50 लक्ष आणि इतर जीवघेणे आजारासाठी 2 लक्ष रुपयापर्यंत मदत करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular