Thursday, April 24, 2025
HomeChief Ministerचंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी 1 लाख राख्या घेऊन मुंबई रवाना

चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणी 1 लाख राख्या घेऊन मुंबई रवाना

Women and employees of Chandrapur district left for Mumbai with 1 lakh rakhyas

चंद्रपुर :- जिल्हा परिषद, चंद्रपुर प्रवेशद्वार येथून उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेमधील चंद्रपूर जिल्ह्यातील उमेदच्या महिला व कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे भाऊसाहेबांना आपल्या लाडक्या बहिनीकडून रक्षाबंधनाच्या दिनी एक छोटीसी भेट म्हणून 1 लाख राख्या सोबत घेवून शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी हिरवी झेंडी दाखवून मुंबईला रवाना केले. Women and employees of Chandrapur district left for Mumbai with 1 lakh rakhyas>> एक लाख राख्या घेऊन लाडक्या बहिणी मुंबई रवाना

यावेळी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकुर, शिवसेना भारतीय कामगार संघटना चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी, महानगर प्रमुख भरत गुप्ता, वैद्यकिय कक्ष प्रमुख जिल्हाप्रमुख अरविंद धिमान, दिपक कामतवार हे सुद्धा उपस्थित राहून उमेदच्या महिला व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत मुंबईला रवाना केले.

लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिला सशक्तीकरणासाठी टाकलेलं एक पाऊल म्हणजे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानाचे सक्षमीकरण व लाडकी बहीन योजना राबविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल खुप खुप आभार मानत जिल्ह्यातील लाडक्या बहिनीकडून रक्षाबंधनाच्या दिनी 1 लाख राख्या घेवून भाऊसाहेबाला एक छोटीसी भेट म्हणून आज मुंबईला रवाना झाल्या.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular