Chandrapur District Guardian Minister Ashok Uike
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री Guardian Minister पद राळेगाव विधानसभा मतदार संघांचे आमदार तसेच राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके Ashok Uike यांना सोपविण्यात आले आहे. अशोक उईके भाजपा आदिवासी आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. मंत्रिमंडळ घोषित झाले परंतु राज्यातील जिल्ह्याचे पालकमंत्री पदांची सूत्रे सोपवायला बराच अवधी घेतला शेवटी पालकमंत्री पदांची घोषणा आज करण्यात आली.


चंद्रपूर चे पालकमंत्री अशोक उईके, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर गडचिरोली चे सह पालकमंत्री एड. आशिष जयस्वाल, नागपूर व अमरावती चे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ठाणे आणि मुंबई शहराची सूत्रे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे आणि बीड जिल्ह्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोपविण्यात आली.
यवतमाळ चे संजय राठोड, वर्धा पंकज भोयर, गोंदिया बाबासाहेब पाटील, भंडारा संजय सावकारे, अकोला आकाश फुंडकर, बुलढाणा मकरंद जाधव (पाटील), वाशीम हसन मुश्रीफ यांना पडे सोपविण्यात आली.