62 boxes of illegal domestic and foreign liquor seized from Warora :: Local Crime Branch raid
चंद्रपूर :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा, सुवस्था व अवैध व्यवसायांवर अंकुश ठेवण्याकरिता जिल्ह्यातील अवैधरीत्या दारू विक्री व साठ्याविरोधात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पोलिसांची करडी नजर ठेवत कारवाई सुरू आहे. या अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा LCB चंद्रपूर यांनी एकाला अटक केली. असून त्यात 54 देशी दारूचा पेट्या किंमत 1 लाख 89 हजार, 8 पेट्या विदेशी दारू किंमत 66 हजार 460 असे एकूण 62 पेटी असा एकूण 2,55,160 रुपयांचा अवैध मध्यसाठा जप्त करण्यात आला. आहे. illegal domestic and foreign liquor seized from Warora
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक मूमक्का सुदर्शन यांनी अवैध धंदे, अवैधरित्या दारू, वाहतूक, विक्री अमली पदार्थ विक्री, व तस्करी करणार्याविरूध्द कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाला गोपनीय माहितीचा आधारे पोलिस स्टेशन वरोरा हद्दीत घरी जाऊन घरझडती घेतली असता अवैध देशी विदेशी दारूचा साठा जप्त करून लाखोचा मुद्देमाल हस्तगत केला. Crime News
सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर चे निरीक्षक महेश कोंडावार यांचा नेतृत्वात विनोद भुरले, स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, नितीन कुरेकार, अजय बागेसर, शशांक बदामवार यांनी केली



