Saturday, January 24, 2026
HomeAssembly Electionविधानसभा निवडणुकी दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात मोठी कारवाई

विधानसभा निवडणुकी दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात मोठी कारवाई

Major action in Chandrapur district during assembly elections

चंद्रपूर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने संशयीतरित्या रोख रक्कमेची वाहतुक करणाऱ्यांना पकडुन कार्यवाही करण्यासाठी जिल्हयात ठिकठिकाणी एस.एस.टी. पॉईन्ट नाकाबंदी तसेच एफ.एस.टी. पेट्रोलींग साठी वेगवेगळे पथक नेमण्यात आले असुन त्यामार्फतीने अवैध रोख रक्कम वाहतुकीवर लक्ष ठेवुन असतांना आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी गुप्त बातमीवरुन वरोरा पोलीस स्टेशन हद्दीत एका संशयीत चारचाकी वाहनांची पोलीस पथक आणि एफ.एस.टी. पथकाने तपासणी केली असता सदर वाहनात मोठया प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसुन आल्याने सदर वाहनास पोलीस स्टेशन वरोरा येथे आणुन वाहनातील रोख रक्कमेबाबत एफ.एस.टी. पथक व वरोरा पोलीसांनी संयुक्तरित्या वाहन धारकाकडे विचारपुस रोख रक्कम एकुण 7500000/- रु. (अक्षरी रु. पंच्हत्यात्तर लक्ष) या रोख रक्कम वाहतुकीचे कारण समाधानकारक उत्तर न दिल्याने सदर वाहनातील रोख रक्कमेचा पंचनामा करुन सदरची रोख रक्कम जप्त करुन पुढील चौकशी करीता आयकर विभागाचे स्वाधीन करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा नयोमी साटम यांचे नेतृत्वात वरोरा पोलीस आणि एफ.एस. टी. पथक वरोरा यांनी केली आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular