5 swords and drugs seized in Chandrapur
Action by Chandrapur city police
चंद्रपूर :- विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने कायदा, सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण राहण्यासाठी चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई करत 5 तलवार, 1 चाकू तसेच अंमली पदार्थ (गांजा) जप्त करीत मोठी कारवाई केली यात वाहनासह एकूण 6,00000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. swords and drugs seized
चंद्रपुर जिल्हयामध्ये विधानसभा निवडणुक 2024 चे अनुषंगाने दिनांक 15 ऑक्टोबर रोजीपासुन जिल्हाधिकारी यांचे आदेशाने आदर्श आचारसहिता लागु झालेली असुन आचारसहिते दरम्यान पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर हद्दीतील गुन्हेगार व गुन्हेगारीला आळा घालणेकरीता तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरीता पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर येथील गुन्हे शोध पथकाने विशेष मोहिम राबवुन दिनांक 15 ते 28 ऑक्टोबर रोजी पर्यंत शस्त्र कायदेबंदी कायद्या अंतर्गत 5 तलवार व एक चाकू तसेच अंमली पदार्थ (गांजा) प्रतिबंधक कलम अन्वये 1.112 कि. ग्र. व एक मोबाईल असा एकूण 21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur Crime
तसेच पो.स्टे. चंद्रपुर शहर हद्दीमध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये एकुण 62 केसेस करण्यात आल्या असुन सदर गुन्हयामध्ये वाहनांसह अंदाजे 600000 रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur city police
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधीकारी सुधाकर यादव, पोलीस निरीक्षक चंद्रपूर शहर पोलीस ठाणे प्रभावती ऐकुरके यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि निलेश वाघमारे, पोउपनि संदीप बच्छिरे, सफौ महेंद्र बेसरकर, कपुरचंद खरवार, रूपेश पराते, संतोष कावळे शाहाबाज सय्यद, विक्रम मेश्राम व महिला पोहवा भावना रामटेके यांनी केली आहे.