Ganja (Drugs) Smuggling from panthela Ramnagar Police conducted a raid
चंद्रपूर :- अंमली पदार्थाची पुड्या बनवून पानठेल्या मधून विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर धाड टाकत रामनगर पोलीसांनी इंदिरा नगर, मूल रोड येथून 1.087 किलोग्रॅम जप्त करीत आरोपी नितीन भलावी विरुद्ध एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली आहे. Drugs Smuggling
चंद्रपूर जिल्ह्यात अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाईची विशेष मोहीम पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
दरम्यान रामनगर पोलीस ठाणे हद्दीत मूल रोड वरील एका पानठेल्यामधून गांजा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त होताच Ramnagar Police Station रामनगर पोलीस ठाणे शोध पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजनबद्ध कारवाई करीत इंदिरा नगर, मूल रोड, वन अकॅडमी समोरील पान टपरी येथे धाड टाकली असता 1.087 किलोग्रॅम गांजा लहान – मोठ्या पुड्या मध्ये आढळून आले, यावरून आरोपी पानठेला व्यावसायिक नितीन भलावी, रा. मोहगाव बस्ती, तहसील कुरई, जिल्हा सिवणी, राज्य मध्यप्रदेश हल्ली राहणार इंदिरा नगर, मूल रोड, चंद्रपूर याला अटक करून गांजा जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध रामनगर पोलीस स्टेशन येथे अपराध क्र. 21/2025 कलम 8 (क), 20 (ब) ¡¡(ब), 29 एनडीपीएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. Chandrapur Today Crime
सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हिमांशु उगले, पोलीस अंमलदार आनंद खरात, सचिन गुरनुले, लालू यादव, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, मनिषा मोरे, अमोल गिरडकर, रविकुमार डेंगळे, संदिप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, ब्ल्युटी साखरे व पथकाने यांनी केली.



