Thursday, April 24, 2025
HomeChief Ministerबाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे लोकार्पण

बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे लोकार्पण

Inauguration of Babupeth Railway Flyover by Chief Minister Devendra Fadnavis through virtual system

चंद्रपूर :- महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रमांतर्गत नागपूरमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाचे आभासी प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, आमदार किशोर जोरगेवार यांची उपस्थिती होती.

बाबूपेठकरांची अतिशय जुनी मागणी असलेला बाबूपेठ उड्डाणपूल रहदारीकरिता सुरू करण्यात आला आहे. मात्र सदर पुलाच्या कामात अनेक अडचणी आल्या. काम शेवटच्या टप्प्यात असताना निधीअभावी रखडले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न करत सदर पुलाच्या कामासाठी जवळपास साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. त्यानंतर सदर पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र लोकार्पण अभावी बाबूपेठकरांची प्रतिक्षा पुन्हा लांबेल असे चित्र निर्माण झाले. यावर तोडगा काढत आमदार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांची अडचण लक्षात घेता सदर उड्डाणपूल रहदारी करिता खुला केला होता.

दरम्यान, महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि., महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त उपक्रम प्रकल्पांतर्गत नागपूर, अमरावती, चंद्रपूर, जळगाव, वाशिम, धुळे आणि वर्धा जिल्ह्यांत उभारण्यात आलेल्या सात उड्डाण पुलांचे नागपूर येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आभासी प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले आहे. यात बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाचे सुद्धा लोकार्पण करण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular