First time AI editing workshop for photographers in Chandrapur
चंद्रपूर :- आजचा या स्पर्धेचा युगात टिकण्यासाठी सर्वांना सक्षम होणे आवश्यक आहे. याच गोष्टीला लक्षात घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील टी.डी.यु.सी. फोटोग्राफर संघटना चंद्रपूर तर्फे नवीन वर्षाच औचित्य साधून एक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून कुशाला सोनी सर, रायपूर, लाभले होते. कुशाल सोनी सरांचा या कार्यशाळेचा लाभ घेण्यासाठी चंद्रपूरातीलच नाही तर आजूबाजूचा जिल्हा व राज्यातील जसे यवतमाळ, गडचिरोली, आदिलाबाद, मंचेरियाल व चंद्रपूरातील सर्व तालुक्यातील फोटोग्राफर बांधवांचा समावेश झाला असून. कुशाल सोनी सरांचा मार्गदर्शनात सर्वांनी या कार्यशाळेचा पुरेपूर लाभ घेत आपल्या ज्ञानात भर टाकले आहे. AI editing workshop for photographers in Chandrapur
तसेच या कार्यशाळेचे प्रयोजक म्हणून नागपूरचे प्रख्यात राकेश अल्बम चे ओनर राकेश मस्के यांचा कडून करण्यात आले असून या कार्यशाळेत राकेश अल्बम चा स्टॉल पण लागण्यात आला, या स्टॉलमध्ये अल्बम चा अनेक व्हेरायटीस व ऑफर्स ठेवण्यात आल्या होत्या.
तसेच सह- प्रयोजक म्हणून यश कॉम्पुटर चंद्रपूर चे दिगांबर चौधरी हे एम.के.सी.एल तर्फे आलेल्या सर्व योजनेचा लाभ गरजू विद्यार्थ्यांना देतात.
तसेच या कार्यशाळेचा शेवटी 5 लक्की कुपण बक्षीस सोनालिका कलर लॅब चंद्रपूर चे श्री सुनील यांचा कडून देणार आले.
तसेच या कार्यशाळेचा शेवटी 5 लक्की कुपण बक्षीस सोनालिका कलर लॅब चंद्रपूर चे श्री सुनील यांचा कडून देणार आले.
तसेच चंद्रपुरात अल्बम डिजाईन क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले संपोषभाऊ जोंधले यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यशाळेचे सूत्र संचालन अमूल कोत्रिवार यांनी केले. तसेच कार्यकामाचा शेवटी एस.के. चित्रपट निर्मित हद्द 2 – एक अन्होनी घटना या चित्रपटाचे प्रोमो पण रिलीज करण्यात आले.
या चित्रपटाचे निर्माते सुदेश भालेकर, दिग्दर्शक- देवा बुरडकर व प्रीतम खोब्रागडे हे आहेत.
या कार्यशाळेचे आयोजनासाठी प्रीतम खोब्रागडे, गणेश साळवे, देवा बुरडकर, रमेश तांडी, गंगा भेंडारकर, मंगेश घडीवार, वैभव कुळमेथे इत्यादींचा सहभाग लाभला.