Food donation and fruit distribution by Vice of Media on the occasion of Journalist’s Day
चंद्रपूर :- पत्रकार दिनाचे औचित्य साधून व्हाईस ऑफ मीडिया मुंबई, शाखा बल्लारपूर तर्फे दिनांक 7 जानेवारीला सकाळी 11.00 वाजता ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे रुग्णांना फळाचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हा कार्यवाहक गणेश रहिकवार व माजी नप उपाध्यक्ष सिक्की यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, Journalist’s Day
तसेच विसापूर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे वृद्धांना भोजनदान करण्यात आले यावेळी व्हाईस ऑफ मिडियाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष शंकर महाकाली, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बल्लारपूर तालुका अध्यक्ष मनोहर दोतपेल्ली व महाराष्ट्र पत्रकार संघ बल्लारपूर तालुका अध्यक्ष रमेश निषाद, पत्रकार, सामजिक कार्यकर्ता नहीम भाई, नंदू तीलोकानी, पत्रकार सचिन मेश्राम यांचे प्रमुख उपस्थितीत भोजनदान कार्यक्रम पार पडला. Food donation and fruit distribution by Vice of Media
यावेळी व्हाईस ऑफ मीडिया चे पत्रकार तालुका संगठक विकास दुपारे, सचिव प्रेम गहलोत ,उपाध्यक्ष ताहीर शेख, व्हॉईस ऑफ मीडियाचे सदस्य चेतन गेडाम, डॉ.राकेश कांबळे, राजेश गेडाम, सामाजिक कार्यकर्ता, माजी नगसेवक विनोद आत्राम, रोहन कळसकर, शांतिकुमार गिरमिल्ला, संतोष बरसागडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.