Health Department appeals to citizens not to panic about HMPV virus
चंद्रपूर :- सध्या चीन मध्ये एचएमपीव्ही (HMPV) या विषाणूचा उद्रेक झाला असून याबाबत विविध बातम्या प्रसारीत होत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. citizens not to panic about HMPV virus
चीनमध्ये आढळलेला मानवी मेटान्युमोव्हायरस अर्थात HMPV हा तीव्र श्वसन संसर्गाचे प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलंड मध्ये 2001 मध्ये आढळून आला होता. हा एक सामान्य विषाणू असून श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास कारणीभूत ठरतो. सर्दीसारखा सामान्य आजार यामुळे होतो. हा एक हंगामी रोग असून हिवाळा व उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. महाराष्ट्रात आतापर्यंत HMPV चा एकही रुग्ण आढळून आलेला नसून कोणीही घाबरण्याचे कारण नाही. तथापी खबरदारीचा भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक सुचानाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गपासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सुचानाचे पालन करावे.
काय करावे : 1. खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा तोंड आणि नाक, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. 2. साबण आणि पाण्याने आपले हात वारंवार धुवा. 3. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा. 4. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा. 5. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेटीलेषण) होईल, याची दक्षता घ्या.
काय करू नये : 1. हस्तांदोलन, 2. टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, 3. आजारी लोकांशी जवळचा संपर्क, 4. डोळे,नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे. 5. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे. 6. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय (सेल्फ मेडिकेशन)घेणे.
तरी जिल्हयातील सर्व नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.