Distribution of umbrellas to students in Morwa, Yerur and Sonegaon on behalf of Omat Waste Limited (Shri Siddhabali Ispat Limited)
चंद्रपूर :- ताडाळी एमआयडीसी स्थित ओमॅट वेस्ट लिमी (श्री सिद्धबली इस्पात लिमि) च्या Omat Waste Limited (Shri Siddhabali Ispat Limited) वतीने मोरवा, येरुर, सोनेगांव या गावांमध्ये विद्यार्थ्यांना छत्रीचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी उद्योगाचे जनसंपर्क विभाग प्रमुख रवि चावरे, मानव संसाधन विभाग प्रमुख अभय सिंह, मुख्य प्रशासन अधिकारी दीपक पराळे यांच्यासह मोरवा सरपंच स्नेहा साव, उपसरपंच भूषण पिदूरकर, शाळेचे मुख्याध्यापक आत्राम सर, येरुर च्या सरपंचा प्रियंका मडावी उपसरपंचा वडस्कर ताई, विजय बल्की, जि. प शाळेच्या मुख्याध्यापिका मोरे मॅडम, सोनेगांव येथील मोरेश्वर गोहणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
गावातील लोकांच्या माध्यमातून या उद्योगाला होत असलेले सहकार्य हे मोलाचे असून त्यांच्या सहकार्याची भरपाई करणे हे अवघड आहे. परंतु ग्रामस्थांचे ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हे आपले कर्त्यव्य समजून देशाच्या भावी पिढीला पावसापासून बचावासाठी छोटेखानी कार्यक्रमाच्या माध्यमातून पावसाळी छत्रीचे वितरण करण्यात येत असल्याचे आपल्या संबोधनातून उद्योगाचे जनसंपर्क प्रमुख रवी चावरे यांनी सांगितले. या गावातील अनेक विद्यार्थी भविष्यात उद्योगात काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करेल. स्थानिक गांवातील युवकांना रोजगार देणे ही प्राथमिकता असतांना युवकांनी पूरक शिक्षण घेण्याचे आवाहन करित ग्राम पंचायतींच्या माध्यमातून सुचविण्यात आलेले काही विकास कामे असो किंवा विद्यार्थ्यांकरिता आवश्यक शालेय सामग्री उपलब्ध करून देण्यात उद्योग सर्वोतोपरी पुढाकार घेईल असा विश्वास यावेळी आपल्या संबोधनातून रवि चावरे यांनी व्यक्त केला.
यावेळी सर्व शाळकरी विद्यार्थी व निराधार वरिष्ठ नागरिकांना पावसाळी छत्रीचे वितरण करण्यात आले. ग्रामस्थांकडून ओ मॅट वेस्ट लिमी (श्री सिद्धीबली इस्पात लिमि) च्या वतीने करण्यात येत असलेल्या उपक्रमाचे समाधान गांवातील पुढारी व लोकप्रतिनिधींकडून संबोधनातून व्यक्त केला.