clerk demanded a bribe from the retired principal
One arrested along with a clerk while accepting a bribe of 5 thousand
चंद्रपूर :- सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांना सेवानिवृत्ती नंतर मिळणाऱ्या सेवाकालावधी दरम्यान अर्जित रजेचा अहवाल प्रमाणित करून लेखाधिकाऱ्यांना पाठविण्याकरिता त्यांच्याच शाळेतील लिपिकाने 15 हजार रुपये लाचेची मागणी केली यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB Trap सापळा रचून लिपिक मोहम्मद अकील इस्राईल शेख व सोबत असलेला खाजगी व्यक्ती श्रीकृष्ण परसराम शेंडे या दोघांना 5 हजारांची लाच स्वीकारताना ताब्यत घेतले आहे. या कारवाई ने शिक्षण विभागातील भोंगळ अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलीच जरब बसली आहे. Bribe Crime
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार नागभीड येथील रहिवासी असून ते समाजसेवा विद्यालय वाढोणा ता. नागभीड जि. चंद्रपुर येथुन मुख्याध्यापक पदावरून 2022 मध्ये सेवानिवृत्त झाले आहे. तक्रारदार यांचे सेवानिवृत्ती नंतर सेवाकालावधी दरम्यान जमा असलेले अर्जीत रजेच्या नोंदी प्रमाणीत करण्याकरीता व मुख्याध्यापक यांचे कवरींग पत्र लेखाधिकारी शिक्षण विभाग जि.प. चंद्रपूर यांचेकडे पाठविण्याकरीता समाजसेवा विद्यालय वाढोणा येथील कार्यरत कनिष्ठ लिपीक मोहम्मद अकिल इस्राईल शेख, वय ५४ वर्ष यांना संपर्क केला असता गैरअर्जदार यांनी तक्रारदार यांना वरील काम करून देण्याकरीता 15,000 रुपये लाचेची मागणी केली. clerk demanded a bribe from the retired principal
परंतु तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार नोंदविली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर द्वारा प्राप्त तकारीवरून दिनांक 7 ऑगस्ट रोजी तक्रारीची गोपनीयरित्या शहानिशा करून पडताळणी व सापळा कारवाईचे आयोजन केले. पडताळणी कार्यवाही दरम्यान कनिष्ठ लिपीक मोहम्मद अकिल इस्राईल शेख यांनी तक्रारदार यांना त्यांचे अर्जीत रजेच्या नोंदी प्रमाणीत करण्याकरीता व मुख्याध्यापक यांचे कवरींग पत्र लेखाधिकारी शिक्षण विभाग जि.प. चंद्रपुर यांचेकडे पाठविण्याकरीता 15,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून 5000 रूपये आधी स्विकारण्याचे व काम पुर्ण झाल्यानंतर 10,000 रुपये नंतर स्विकारण्याची तयारी दर्शविली. ACB Action
त्यावरून दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी लिपिक शेख यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम घेवुन मौजा वाढोणा येथिल चौरस्ता येथील अपना टि स्टॉल अॅन्ड नास्ता पॉईन्ट येथे बोलाविल्याने तेथे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कार्यवाही केली, कार्यवाही दरम्यान लिपिक मोहम्मद अकिल इस्राईल शेख यांनी तक्रारदार यांना लाचेची मागणी करून 5000 रूपये लाच रक्कम स्विकारून त्याचे जवळ उभे असलेले खाजगी इसम श्रीकृष्ण परसराम शेडे वय 34 वर्ष रा. वाढोणा ता. नागभीड जि. चंद्रपुर यांचेकडे दिले असता दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले, पुढील तपास कार्य सुरू आहे. One arrested along with a clerk while accepting a bribe of 5 thousand
सदरची कार्यवाही राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात तसेच श्रीमती मंजुषा भोसले, पोलीस उपअधीक्षक लाप्रवी कार्यालय चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जितेन्द्र गुरनुले, पोहवा नरेश नन्नावरे, पोशी राकेश जांभुळकर, अमोल सिडाम, मपोशी मेषा मोहुर्ले, बालक पोहवा रवि तायडे यांनी यशस्वी पार पाडली आहे.
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागासोबत संपर्क साधावा असे आवाहन विभागाने केले आहे.