Always committed to the demands of OBC community- MP Pratibha Dhanorkar
The 9th National Convention at Amritsar concluded on a grand note
चंद्रपूर / अमृतसर :- मी सदैव ओबीसी समाजाच्या OBC Society पाठीशी असून त्यांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी मी सदैव कटिबध्द असल्याचे मत खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी अमृतसर येथे आयोजित 9 व्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात केले.7 ऑगस्ट रोजी अमृतसर येथे ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. बहुसंख्येने असणाऱ्या ओबीसी बांधवांच्या मागण्यांवरील चर्चा संदर्भात या अधिवेशनात विविध विषयासंदर्भात ठराव घेण्यात आले. The 9th National Convention at Amritsar concluded on a grand note
या वेळी खासदार धानोरकर म्हणाल्या की, प्राण्यांची जनगणना होते, परंतु आपली जातनिहाय जणगनना न होणे ही बाब चुकीची आहे. ओबीसी समाजाने आज जागृत राहणे गरजेचे असून जातनिहाय जणगननेकरीता माझा लढा कायम राहणार आहे.
ओबीसी समाजाच्या नॉन क्रिमीलेअर ची मर्यादा 15 लाख करावी यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याचे तसेच ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहणार तसेच ओबीसी समाजाचा एक घटक म्हणून मी सदैव ओबीसी समाजाच्या पाठीशी राहुन वेळेप्रसंगी आंदोलन देखील करण्यास मी तैयार राहील असे मंचावरून खासदार धानोरकर यांनी सांगितले. Always committed to the demands of OBC community- MP Pratibha Dhanorkar
यावेळी मंचावर मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष श्री. हंसराज अहिर, ओबीसी चे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे, माजी मंत्री महादेवराव जानकर, खासदार डॉ. नामदेवराव किरसान, आमदार सुधाकर अडबाले, आमदार परिणय फुके, अशोक जिवतोडे, सचिन राजुरकर यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.